इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात शांतीगिरी महाराज यांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेना गटात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी त्यावर प्रतिक्रिया देतांना अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, ही एक अफवा आहे. पक्ष सकारात्मक पक्ष विचारत करेल व मला उमेदवारी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीतर्फे नाशिक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे रोज एक नवे नाव पुढे येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या इच्छुकांची मात्र मोठी पंचायत होत आहे. शांतीगिरी महाराज यांना अद्याप पक्षाकडून एबीफॅार्म मिळालेला नाही. त्यांना ३ मे पर्यंत तो जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहे.
दरम्यान या उमेदवारी बाबत शांतीगिरी महाराज यांनी माझी एकनाथ शिंदे यांच्याची चर्चा झालेली नाही. तर आमच्या समितीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झाल्याचे सांगितले.