इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे चार तारखेला संध्याकाळी पाच वाजता कणकवलीत सभा घेणार आहे.
कणकवली येथील उप रुग्णालयासमोरील मैदानात राज यांची सभा होईल. राणे हे महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज सभा घेतील अशी चर्चा होती. या मतदारसंघात राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. राणे आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या हाडवैरामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज मैदानात उतरल्याण राणे यांच्या प्रचाराला आणखी धार चढणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उदय सामंत आणि राणे यांनी राज यांच्या अनुपस्थितीची खंत बोलून दाखवली होती.