इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सूरत पाठोपाठ आता मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष सिंह यांनी ही माहिती दिली. त्यानंतर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांना त्यांचा भाजपामध्ये स्वागत असल्याचे ट््विट केले आहे.
या सोशल मीडियामधील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अक्षय कांती यांचे भाजपमध्ये आपले स्वागत आहे. सूरतमध्ये काँग्रेसच्या उमदेवारांच्या सुचकांच्या सहीवरुन त्यांचा अर्ज बाद केला. त्यानंतर त्यानंतर तेही भाजपमध्ये दाखल झाले. आता सूरत पाठोपाठ काँग्रेसला दुसरा धक्का मध्यप्रदेशमध्ये देण्यात आला. या ठिकाणी काँग्रेसचे आव्हानच संपूष्ठात आणले गेले. अधिकृत उमेदवारांनीच माघार घेतल्यामुळे आता या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध होते की पुढे काय घडते हे बघणे महत्त्वाचे आहे.
या मतदार संघात अर्ज भरण्याची तारखी २५ एप्रिल तर मागे घेण्याची तारीख २९ एप्रिल होती. त्यात या घडामोडी घडल्या आहे.