इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनमाडजवळ असलेल्या नागपूरच्या इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती घटना घडली. पण, सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही, पण, मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचे इंधन वाया गेले. पहाटेच्या सुमारास प्रकल्पातील येणारे इंधन अतीदाबाने आल्याने पाईप लाईनला गळती झाली. या दाबामुळे १० ते १५ मीटरपर्यंत इंधनाचे फवारे उडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पण, या घटनेनंतर सुरक्षेचे कारण देत कंपनी प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. पण, नागापूर ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे.
ही घटना संवेदनशील असल्यामुळे इंधन प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्थापणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गळती झालेली पाईप लाईन दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे कळते. या घटनेमुळे आज सकाळपासून इंडियन ऑइल प्रकल्पातून होणारी उत्तर महाराष्ट्रातील इंधन वाहतूक ठप्प झाली आहे.
या प्रकल्पाची इंधन वाहतूक ठप्प झाल्यामुळे मराठवाडा, खान्देश सह ७ ते ८ जिल्ह्यात इंडियन ऑइल पंपावर इंधन तुटवडा निर्माण होणार आहे. तर कंपनी च्या पार्किंग मध्ये ३०० पेक्षा जास्त गाड्या उभ्या राहिल्या आहे.