इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीतर्फे नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर, दिंडोरीतून भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. शालिमार येथील शिवसेना (ठाकरे गट) कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचार फेरी काढून हे शक्तीप्रदर्शन कऱण्यात आले. यावेळी ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करत असतांना नाशिकच्या जागेच्या तिढ्यामुळे महायुतीचे उमेदवारी अर्ज उशीरा भरले जाणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी डॅा. भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली असली तरी नाशिकमध्ये उमेदवार जाहीर न झाल्यामुळे ही तारीख लांबणार आहे.