इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे ड्रग्ज प्रकरण राज्यात गाजत असतांना दुसरीकडे मुंबईतील उपनगरीय रेल्वेत थेट महिलांच्या डब्यात घुसुरुन नशा करत असल्याचा व्हिडिओने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही असा आरोप केला जात असतांना आता रेल्वेच्या प्रवाशांचा सुरक्षाचाही प्रश्न रडारवर आला आहे.
हा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रिपोस्ट केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. महिलांच्या डब्यात घुसून नशा करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे. याबाबत स्पष्ट भाष्य तर करीत आहेच. याशिवाय तरुणांना नशेची हि सामुग्री राजरोसपणे मिळत असल्याचे देखील स्पष्ट करीत आहे.
रेल्वे सुरक्षा आणि मुंबई पोलीस यांनी समन्वय साधून काम केले तरच अशा प्रकारांना पायबंद घातला जाणे शक्य आहे. या व्हिडिओची रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी नोंद घेऊन उचित ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ समृध्दी ठाकरे यांनी पोस्ट केला आहे. त्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी त्याची दखल घेत सरकारचे लक्ष वेधले आहे. ठाकरे यांनी केलेल्या व्हिडिओबरोबर लिहले आहे की, System Need to be changed, Kindly Notice from Railway Ministry, Maharashtra Government & Mumbai Police महिलांच्या डब्यात आता नशा करण्यापर्यंत मजल हाच आहे का प्रगतशील महाराष्ट्र..!