नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात हद्दपारीची कारवाई झालेली असतांना राजरोसपणे शस्त्रासंह वावरत असलेल्या दोन तडीपारांना पोलिसांनी गजाआड केले. शुक्रवारी (दि.२६) वेगवेगळया भागात दोन तडिपारांना पोलीसांना पकडले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूलसह धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विक्की विलास शिराळ (२४ रा.विठ्ठल मंदिराजवळ,विहीतगाव) व गणेश विष्णू कु-हाडे (२३ रा.शॉपींग सेटर मागे,इंदिरानगर वसाहत क्र.१ शिवाजी चौक) अशी अटक करण्यात आलेल्या शस्त्रधारी तडिपारांची नावे आहेत. गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई करण्यात आलेला विक्की शिराळ आपल्या घर परिसरात आलेला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार उपनगरच्या डीबी पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असता अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा व जीवंत काडतुसे आढळून आले. सुमारे २० हजार रूपये किमतीचे अग्निशस्त्र पोलीसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी अंमलदार जयंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत. दुसरी कारवाई जुने सिडकोतील शिवाजीचौक भागात करण्यात आली. गणेश कु-हाडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी रात्री तो शिवाजीनगर येथील महाराष्ट्र मेडिकल दुकान परिसरात आढळून आला. त्याच्या अंगझडतीत धारदार लोखंडी याबाबत अंमलदार प्रविण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
…….