इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी दिल्लीत संपन्न झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे, सोनीया गांधी, महासचिव केसी वेणुगोपाल हे उपस्थितीत होते. या बैठकीत अमेठी व रायबरेलीत राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उमेदवार बनवण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर याबाबतचा निर्णय़ घेण्याचे अधिकार अध्यक्ष खरगे यांना देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गांधी घराण्याशी संबधीत जागेवर कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा सुरु आहे. त्यात निवडणुकीचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. अशात उमेदवार जवळपास निश्चित होत असतांना या चर्चेच्या जागेवर निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे या बैठकीत त्यावर चर्चा झाली. त्यांनंतर निर्णय घेण्याचा अधिकार खरगे यांना देण्यात आले.
रायबरेलीबाबत उमेदवार कोण असेल हे ठरले नसले तरी अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात आहे. त्यामुळे या जागांवर अजूनही तसा सस्पेंस आहे.