इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असतांना आज त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पहिला रोड शो करत मतदारांना भावनिक साद घातली.
यावेळी त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल हे सिंह आहेत. त्यांना कोणीही वाकवू शकत नाही, कोणी तोडू शकत नाही. अरविंद केजरीवाल हे भारतमातेचे खरे पुत्र आहेत.
आज मी, भारतमातेची कन्या, तुम्हाला विनंती करते की, भारत मातेला हुकूमशाहीपासून वाचवा. २५ मे रोजी आपल्या मताच्या बळावर भारत मातेला हुकूमशाहीच्या साखळीतून मुक्त करा.