नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक – पुणे मार्गावर गोमासची वाहतूक करणारी कार पोलीसांनी पकडून गोमांसासह कार असा सुमारे ९६ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत संगमनेर येथील चालकास पोलिसांनी गजाआड केले आहे.
जफर उमर कुरेशी (३२ रा. भारतनगर,संगमनेर जि.अ.नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत अंमलदार किरण खर्जे यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक पुणा महामार्गावरून गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार शुक्रवारी (दि.२६) पुणे महामार्गावरील दारणा ब्रिज भागात पोलीसांनी वाहन तपासणी केली असता संशयित चालकाच्या कारमध्ये जनावरांचे मास आढळून आले. चालकास बेड्या ठोकत पोलीसांनी कारसह गोमास असा सुमारे ९० हजाराचा ऐवज जप्त केला असून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.