इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर मध्य मुंबईतून भाजपने प्रसिध्द सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात दोन दिवसापूर्वी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. या जागेवर विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा पत्ता भाजपने पत्ता कट केला आहे. या जागेवर मुंबई काँग्रसेच अध्यक्ष आशिष शेलार यांचे नावही चर्चेत होते. पण, भाजपने निकम यांना पसंती दिली.
निकम हे मुळ जळगावचे असले तरी मुंबईतील बॅाम्बस्फोट प्रकरणात त्यांनी सरकारतर्फे बाजू मांडत अनेक गुन्हेगारांना शिक्षा दिली. त्यानंतर त्यांनी अनेक प्रकरणात सरकारतर्फे बाजू मांडण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे मुंबईशी वेगळे नातं आहे. त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.