नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राजीवनगर वसाहतीत अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर भाजलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सारांज सर्जेराव अंभोरे (रा.राजीवनगर वसाहत) असे मृत बालकाचे नाव आहे. सारांज गेल्या शुक्रवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास खेळत असताना ही घटना घडली होती. आंघोळीसाठी तापवलेले उकळते गरम पाणी सांडल्याने तो गंभीर भाजला होता.
कुटुंबियांनी त्यास सुविधा हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता आठवडा भराच्या उपचारानंतर शुक्रवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.