इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचा उमेदवार आज जाहीर होणार असल्याची चर्चा असतांना महंत अनिकेत शास्त्री यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे त्यांनीच राज्य व केंद्र स्तरावर आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा सुरु आहे. वरीष्ठांच्या सूचनेनुसारच उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु केल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे या मतदार संघात आता नवा ट्विस्ट आला आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महंत अनिकेत शास्त्री धर्म अभ्यासक, महर्षि पंचायतन सिध्दपीठाचे पीठाधीश्वर, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. ते निवडणुकीत उतरल्यामुळे तीन महंतामध्ये निवडणूक रंगणात आहे. याअगोदर शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे महंत सिध्देश्वरानंद सरस्वतीची महाराज उमेदवारी अर्ज भरणार आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात भाजपसाठी डॅा. प्रितम मुंडे यांचे नाव अगोदर आले. त्यानंतर आता महंत अनिकेत शास्त्री यांचे नाव चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अॅड. माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळते हे औत्सुक्याचे ठरले आहे.