मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात स्वाईन फ्लूचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असून, स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वाईन फ्लूने माजी कृषी अधिकारी व एका महिलेचा मृत्यू झाल्याने मालेगाव महापालिका प्रशासनाचे आरोग्य विभाग पुन्हा एकदा अर्लट मोडवर आले आहे.
मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची तसेच परिसरातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोणालाही सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी केले आहे.