इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : २००९ मध्ये झालेल्या जिगिषा घोष हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांपर्यंत केवळ हातावरचा एक टॅटू आणि पोलिसांकडून चोरलेला वायरलेस फोन यामुळे शोध लागला आहे. केवळ या दोन गोष्टींच्या आधारे जिगिषा घोष प्रकरण उलगडता आले असून या आरोपींनी सौम्या विश्वनाथच्या हत्येचीही कबुली दिली आहे.
२००९ मध्ये जिगिषा घोष या मुलीच्या हत्या प्रकरणात रवी कपूर, अमित शुक्ला आणि बलजीत मलिक यांना अटक केली. दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातल्या आरोपींना दोषी ठरवलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १५ वर्षांपूर्वी पत्रकार सौम्या विश्वनाथनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सौम्या विश्वनाथनला ३० सप्टेंबर २००८ च्या दिवशी पहाटे ३.३० ला हत्या करण्यात आली. ती आपल्या कारने घरी परतत होती. त्याचवेळी तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तिला ठार करण्यात आले. पोलिसांनी हा दावा केला की तिची हत्या लुटीच्या उद्देशाने झाली होती.
या हत्या प्रकरणात रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना अटक करण्यात आली. २००९ पासून हे सगळे तुरुंगात आहेत. पोलिसांनी सगळ्या आरोपींवर मकोका लावला आहे. जिगिषा घोषचा मृतदेह पोलिसांना मिळाला तेव्हा सर्वात पहिला पुरावा आम्हाला मिळाला तो सीसीटीव्ही फुटेजचा. त्यानंतर आमच्या लक्षात आले की आरोपीच्या हातावर टॅटू आहे. तसेच जिगिषाचे डेबिट कार्ड वापरुन आरोपींनी खरेदी केली होती. तसेच एका आरोपीकडे पोलिसांकडून चोरलेला वायरलेस होता. या सगळ्यामुळे हे आरोपी पकडले गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्कचे लाभले सहकार्य
पोलिस अधिकाऱ्यांनी पुरावे शोधले. तसेच दिल्ली पोलिसांच्या ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्कनेही यावर बारकाईने काम केले. त्यामुळे कपूर आणि शुक्ला या दोघांना अटक करता आली. तसेच मलिकच्या हातावर टॅटू होता आणि कपूरकडे वायरलेस सेट. यामुळे हे आरोपी पकडले गेले. जिगिषाचे अपहरण केल्यानंतर आणि तिला लुटल्यानंतर या सगळ्यांनी तिची हत्या केली. तसंच तिचा मृतदेह फेकून दिला. तिच्याकडे असलेले पैसे लुटले आणि डेबिट कार्डने खरेदीही केली.