गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात अवकाळीचे वातावरण निवळणार की राहणार? बघा हवामान तज्ञाचा अंदाज

by India Darpan
एप्रिल 27, 2024 | 12:39 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 83

माणिकराव खुळे, हवामान तज्ञ
१- संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार दि.२९ एप्रिलपर्यंत म्हणजे अजुन ४ दिवस, ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (वीजा, वारा,)पावसाची शक्यता ही कायम आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील पण कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती क्षेत्रातील तालुक्यात तर हे वातावरण अजुन २ दिवस म्हणजे १ मे पर्यंत टिकून राहू शकते.

२-मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गुजरात राज्यात मात्र २७ ते ३० एप्रिलच्या चार दिवसात (शनिवार ते मंगळवार) दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यताही जाणवते, तर तेथील किनार पट्टीवरील क्षेत्रात तर दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.

३-मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा १० जिल्ह्यात मात्र पहाटेच्या किमान तापमान हे सरासरीपेक्षा ५ डिग्री से. ग्रेडने झालेल्या वाढीमुळे ह्या ४ (२७ ते ३० एप्रिल) दिवसात रात्रीच्या उकड्यातही वाढ ह्या १० जिल्ह्यात होण्याची शक्यता जाणवते.

४- संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण चार दिवसानंतर म्हणजे मंगळवार दि.३० एप्रिलपासून निवळण्याची शक्यता जाणवते.

५–सध्या सोमवार दि.२९ एप्रिल पर्यन्त सकाळी वातावरण जरी स्वच्छ वाटत असले तरी दुपारनंतर अवकाळीचे वातावरण तयार होते व ते मध्यरात्री पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता असते. त्यातच रब्बीतील पिकांपैकी सध्या मागास कांदे साठवणी तर भरड धान्ये मशीनिंग, रास भरणी , वाळवणी इ. स्थितीत खळ्यावर आहेत.

त्यामुळे अश्या शेतकऱ्यांनी सोमवार दि.२९ एप्रिल पर्यन्त गाफील न राहता सावधानता बाळगुन खळ्यावरील कामाचे नियोजन करणे गरजेचे समजावे, असे वाटते. मंगळवार ३० एप्रिलपासून मात्र वातावरण स्वच्छ होवु शकते. आणि, त्यानंतर दुपारच्या कमाल तापमानातही सध्यापेक्षा हळूहळू २ ते ३ डिग्रीने वाढ होवु शकते.असे वाटते.

६-सध्या जरी हे वातावरण निवळत असले तरी पूर्व-मोसमी हंगाम अजुनही ४० ते ५० दिवस बाकी आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट व चक्रीवादळ निर्मिती अश्या सारख्या हंगामी वातावरणीय घटनांची शक्यता ही असतेच. तसे काही असल्यास, त्या त्या वेळी सूचित केले जाईल.

७-वरील १ ते ३ मधील सध्याच्या उष्णता व अवकाळी वातावरणास खालील वातावरणीय प्रणाल्या पूरक जाणवतात.
(i)अवकाळीसाठी – समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीवर हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस व त्यातून तयार होणारी वारा खंडितता प्रणाली महाराष्ट्रावर सुस्पष्ट असुन मराठवाड्यावरही एक चक्रीय वाऱ्याची स्थितीही आहे.
(ii)उष्णतेसाठी इराण, अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तानातून गुजराथ मार्गे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उष्ण वाऱ्याचे वहन होत आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या ठिकाणी सापडला मोठा शस्त्रसाठा…सीबीआयने दिली ही माहिती

Next Post

नांदेड जिल्ह्यात ईव्हीएम तोडफोड…आधी झालेल्या मतदानाबाबत जिल्हा प्रशासनाने दिले हे स्पष्टीकरण

India Darpan

Next Post
Nanded

नांदेड जिल्ह्यात ईव्हीएम तोडफोड…आधी झालेल्या मतदानाबाबत जिल्हा प्रशासनाने दिले हे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011