इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईत उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस नेते नसीम खान प्रचंड नाराज झाले आहे. ते या जागेसाठी आग्रही होते. त्यांना तयारी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते. पण, अचानक ही उमेदवारी वर्षा गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी त्यांनी आपण स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे.
या नाराजीमागे उमेदवारी न मिळाल्याचे कारण त्यांनी सांगितले. पण, महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. पूर्वी परंपरा अशी होती की एक किंवा दोन मुस्लिम समाजाचे उमेदवार देण्याची परंपरा होती. पण या वेळेस पहिल्यांदा असं झालं की अल्पसंख्यांक समाजाचा एकही उमेदवार देण्यात आलेला नाही, यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे की अल्पसंख्यांक समूहाचा एकही उमेदवार देण्यात आलेला नाही. अनेकांचे मला फोन आले. अनेक जण भेटून देखील गेले. मी प्रचारासाठी अल्पसंख्यांक लोकांना उत्तर काय देऊ? माझ्याकडे देण्यासाठी उत्तर नाही म्हणून मी स्टार प्रचारकांमधून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.