इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुती व महाविकास आघाडीमुळे राज्याच्या राजकारणात आपली ओळख असणारे दोन्ही ठाकरे वेगवेगळ्या पक्षाला मतदान करणार आहे. लोकसभेच्या या निवडणुकीत उध्दव ठाकरे यांचे मतदान हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात येथे येणार आहे. या ठिकाणी आता काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या उमेदवार असल्यामुळे ते पहिल्यांदा ते पंजाला मतदान करणार आहे.
तर राज ठाकरे यांचा शिवतीर्थ बंगला हा दक्षिण मध्य मुंबईत लोकसभा मतदार संघात येतो. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे उमेदवार आहे. त्यामुळे राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे यांचे पक्ष वेगवेगळे आहे. उध्दव ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल आहे. पण, त्यांना मशालला मतदान करता येणार नाही. तर राज ठाकरे यांच्या मनसेची निशाणी ही इंजिन आहे. पण, त्यांचा पक्षच निवडणुकीत नाही. त्यांनी महायुतीला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्याना धुनष्यबाणाला मतदान करावे लागणार आहे.
राज्याच्या राजकारणात असे काही बदल झाले की त्यामुळे ठाकरे बंधुंना आपल्याच पक्षाला मतदान करता येणार नाही. त्यात राज ठाकरे यांनी ज्या शिवसेने विरुध्द बंड करुन मनसे पक्ष सुरु केला. त्याच शिवसेनेला पुन्हा मतदान करावे लागणार आहे. तर उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंत काँग्रेसला विरोध केला. त्यांनाच आता पंजाला मतदान करावे लागणार आहे.