जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 29 उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवार दि.25 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 24 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. तर रावेर लोकसभा मतदार संघात 31 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची शुक्रवार दि.26 एप्रिल, 2024 रोजी छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे जळगाव लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक डॉ. राहुल गुप्ता तर रावेर लोकसभेसाठीचे सर्वसामान्य निरीक्षक अशोक कुमार मीना हे उपस्थितीत होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची जळगांव लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तर रावेर लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी छाननी केली.
जळगांव लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार* :- करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,) विलास शंकर तायडे (बहुजन समाज पार्टी ), स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पार्टी ) ईश्वर दयाराम मोरे ( सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी( अखिल भारत हिंदू महासभा), युवराज भीमराव जाधव( वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे( अपक्ष), अहमद खान युसुफ खान( अपक्ष), करण संजय पवार( अपक्ष), पाटील संदीप युवराज( अपक्ष), प्रदीप शंकर आव्हाड( अपक्ष), डॉ. प्रमोद हेमराज पाटील, ( अपक्ष), महेंद्र देवराम कोळी( अपक्ष), मुकेश मूलचंद कोळी( अपक्ष), रोहित दिलीप निकम( अपक्ष), ललित गौरीशंकर शर्मा( अपक्ष), लक्ष्मण गंगाराम पाटील( अपक्ष), अडव्होकेट बाबुराव तुकाराम दाणेज( अपक्ष), संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी (पाटील) (अपक्ष), संजय एकनाथ माळी( अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
जळगांव लोकसभा मतदार संघात चार अवैध ठरलेले उमेदवार* :- अंजली करण पाटील, मोहसिन खान, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, ईशान राठोड असे आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार* :- रक्षा निखिल खडसे,(भारतीय जनता पार्टी), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), श्रीराम दयाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), अशोक बाबुराव जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक)), गुलाब दयाराम भिल (भारती आदिवासी पार्टी), नाजमीन शेख रजमान (सर्व समाज जनता पार्टी), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी), संजय पंडीत ब्राम्हणे (वंचित बहुजन अघाडी), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल)), अनिल पितांबर वाघ (अपक्ष), अमित हरिभाऊ कोलते (अपक्ष), प्रा. डॉ. आशिष सुभाष जाधव (अपक्ष), एकनाथ नागो साळुंके (अपक्ष), कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील (अपक्ष), नितीन प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष), प्रविण लक्ष्मण पाटील (अपक्ष), भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग बारेला (अपक्ष), डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), रऊफ युसुफ शेख (अपक्ष), राहुलरॉय अशोक मुळे (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सिताराम पाटील (अपक्ष), शेख आबिद शेख बशीर (अपक्ष), शेख कुर्बान शेख करिम (अपक्ष), सागर प्रभाकर पाटील (अपक्ष), संजय प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात दोन अवैध ठरलेले उमेदवार :- रविंद्र प्रल्हादाराव पाटील, गयासुद्दीन सदरोद्दीन काझी असे आहेत. अवैध ठरलेल्या उमेदवारांना 29 एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे.