इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : भावाची पत्नी म्हणजे बहिणीसमान. बहिणीसारखाच तिला दर्जा असतो. मात्र, भिवंडीत भगिनीस्वरूप असलेल्या भाऊजईला दीराने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला आहे. लहानसहान कारणांवरून मारहाण करणे, अत्याचार करणे आदी प्रकार घडताहेत. अशात फोन कट केल्याच्या रागातून दिराने आपल्या भावजईला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कामतघर परिसरात घडली आहे. याप्रकरणी भावजईने दिलेल्या तक्रारीवरून दिरा विरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल माणिक होळकर वय ३२ वर्ष रा. शिवाजी नगर कामतघर असे भावजाईला मारहाण करणाऱ्या आरोपी दिराचे नाव आहे. त्याने आपल्या ३० वर्षीय भावजईने फोन फोन कट केल्याच्या रागातून मारहाण केली. भावजई घरा बाहेर कपडे धुवत असतांना फोन कट केल्याच्या रागाने भावजईला माझा फोन का कट केला? असे म्हणत भाऊजाईला शिवीगाळ करत कपडे धुण्याच्या धुपटन्याने बेदम मारहाण करून धमकी दिली.
भावजईने केली तक्रार
भिवंडी येथील या प्रकरणी भावजईने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याबद्दल पोलिसांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच अशा स्वरूपाची मारहाण करण्यामागे दोघांमधील अनैतिक संबंध वा दिर मानसिक रुग्ण तर नाही ना, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामत: त्या दिशेने देखील पोलिस तपास करत असल्याची माहिती आहे.