नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट लिमिटेड आणि कन्सन इंडिया फाउंडेशन या दोन्ही संस्था मिळून नाशिक जिल्ह्यासाठी तीन अद्यावत रुग्णवाहिका व संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका अशा एकूण चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, नाशिक विभागाचे उपसंचालक आरोग्यसेवा डॉ कपिल आहेर, डॉ सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक, वीरेंद्र बन्सल – MD, CEO, SBICAPS शेष राम वर्मा – अध्यक्ष आणि सीओओ, SBICAPS जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ हर्षल नेहते ,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक लोणे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, कृष्णन कुट्टी – CFO, SBICAPS , श्री रोशन नेगी – प्रमुख, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि CSR ,श्री गोविंद राव – संपर्क अधिकारी, SBICAPS श्रीमती अॅना जॉय , डायरेक्टर प्रोग्राम्स, कन्स॔न इंडिया फाउंडेशन श्रीमती बियान्का नागपाल शाखा व्यवस्थापक, मुंबई कन्स॔न इंडिया फाउंडेशन हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. संस्था शासनाच्या विविध कार्यामध्ये आपला सहभाग दाखवून जनतेला चांगल्या प्रकारे रुग्णसेवा मिळावी या उदात्त हेतूने ही संस्था सतत कार्यशील असते याप्रसंगी सुधाकर मोरे यांनी शासन आणि संस्था यांच्या समन्वयाने आपण चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा गुणवत्तापूर्वक देऊ शकतो याबाबत वेळोवेळी वेगवेगळ्या पातळीवर आम्हाला संस्थेने मदत करत राहावी तसेच नाशिक जिल्ह्यासाठी ३० रुग्णवाहिकांची गरज असून याबाबत संस्थेने आम्हाला आपल्या स्तरावरून मदत करावी असे प्रस्तावित केले. यानंतर डॉ कपिल आहेर यांनी मार्गदर्शन केले संस्थेने ज्या प्रकारे नाशिक जिल्ह्याला आदिवासी दुर्गम भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून जनतेची सेवा केली. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील नंदुरबार या जिल्ह्यासाठी सुद्धा अशा प्रकारे भरघोस मदत करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी केले कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅन्ड्रा तिरकी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती अना जॉय, श्रीमती बियांका नागपाल,पंकज आमटे, सुरेश जाधव, खादे, प्रदीप निकम जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी नाशिक, संजय गांगुर्डे, श्रीमती सुरेखा गुंबाडे यांनी प्रयत्न केले.