मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मतदान सुरु होताच केंद्र सरकारने गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रू मात्र केंद्र सरकारला अजूनही दिसत नाहीत. महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का? की #मोदीकापरिवार मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी येत नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, भाजपावाले आणि भाजपासोबत गेलेले ‘विकासा’वाले यावर तोंड उघडणार का?
केंद्र सरकारला जाब विचारणार का?