इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा देऊन पाठिंबा दिल्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या मतदार संघात विशाल पाटील यांनी अगोदर काँग्रेसला धक्का दिला आता भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.
राजीनामा देणा-या भाजपचे नगरसेवकात संदीप आवटे, निरंजना आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांचे नाव आहे. त्यांनी नगरसेवक व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
हे नगरसेवक अगोदरच प्रचारात सहभागी झाल्यामुळे भाजपने कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. पण, त्या अगोदरच त्यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे भाजपच्या आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना असून त्यामुळे भाजपच्या उमेदवार संजयकाका पाटील यांना येथे मोठा धक्का मानला जातो.