नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दोन विवाहीतांचा सासरी मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याप्रकरणी पंचवटी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकीचा माहेरून पैसे आणावेत यासाठी तर दुसरीने फारकत द्यावी या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आला असल्याच्या तक्रारी आहे.
पहिली घटना केंद्रशासीत दादर नगर हवेली येथे घडली. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पती अकबर अकील शेख (रा.वाविशा कॉम्प्लेक्स,आमली) सह सासरच्या सात जणांनी विवाहीतेचा छळ केला. माहेरून पैसे आणले नाही तसेच घरगुती कारणातून कुरापत काढून तिचा छळ करण्यात आला. २०२० पासून हा प्रकार सुरू असून शिवीगाळ व मारहाण करण्यात येवून तिचे स्त्रीधन काढण्यात आल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.
दुस-या घटनेत पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पती सुमित महेंद्र पवार (रा.राजूर ता. अकोले अ.नगर) व सासरच्या पाच जणांनी तिचा छळ केला. २०२० पासून संशयितांकडून पीडितेकडे फारकत द्यावी या मागणीसाठी छळ सुरू असून तिला घराबाहेर काढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.