इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः भारतीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एकाच वेळी नोटीस पाठवली आहे. त्यांच्या काही वक्व्यावरून २९ तारखेच्या सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
मोदी यांनी राजस्थानच्या बांसवाडा येथे एका निवडणूक सभेत काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत. त्यांच्यामध्ये वाटू शकतात, या मोदी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली. पंतप्रधान हिंदू-मुस्लिम वाद करतात, असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.
तर भारतीय अध्यक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप केला होता. राहुल गांधी त्यांच्यासभेत ज्या भाषेचा, शब्दांचा वापर करतात अशी तक्रार निवडणूक आयोगात केली होती. राहुल यांनी तामिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केला होता.