इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेरुचा मळा परिसरात पाथर्डी शिवार येथे प्रकाश बांदेकर यांचे जागेत पत्र्याचे शेड मधील तीन पत्ती जुगार अड्डयावर छापा टाकत पोलिसांनी १३ लाख ३२ हजार २८५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. परिमंडळ २ च्या मोनिका राऊत यांनी ही कारवाई केली. समीर पठाण हा इसम पैश्यांवर तीन पत्ती जुगार मोठया प्रमाणात खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ही माहिती मिळाल्यानंतर उपआयुक्त राऊत यांनी त्वरीत टिम तयार केल्या. त्यानंतर खातरजमा करून छापा टाकला. या टिमने १४ आरोपी, रोख ८५ हजार २८५ रुपये जुगाराचे साहित्य साधने, ११ मोटार सायकली, ६ चारचाकी वाहने, १ रिक्षा, २१ मोबाईल, असा असा एकुण तेरा लाख, बत्तीस हजार, दोनशे पंच्यांशीचा माल जप्त केला.
आर्थिक फायदयासाठी सदर जुगार अड्डा चालविणारा व जुगार अड्ड्यासाठी जागा उपलब्ध करुन देणारा तसेच सदर अवैध धंदयांतील अन्य आरोपी निष्पन्न करून कडक अशी कारवाई करण्यांत येणार आहे. त्याच प्रमाणे नाशिक महानगर पालिकेस पत्रव्यवहार करुन सदर जागेची खातरजमा करून रितसर कारवाई करुन उभारण्यांत आलेले पत्र्याचे शेड, सिमेंट,विटा मध्ये बांधलेले बांधकाम हे अतिक्रमित असल्यास काढून टाकण्यात येणार आहे.
सदर कारवाई बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पुढील तपास चालू आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कार्यभार स्विकारल्या पासून सर्वच प्रकारच्या अवैध धंदया विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित करुन स्वतंत्रपणे विशेष पथकांची स्थापना देखील केलेली आहे. या आदेशावरुन या कारवाया सुरु आहे.