इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे गेल्यामुळे येथे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंड केले. त्यानंतर आज सांगलीत काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी दमदार भाषण केले. त्यांचे हे भाषण आता चांगलेच चर्चेत आहे.
यावेळी ते कदम म्हणाले की, ज्यांनी हे कटकारस्थान केले त्यांना सोडणार नाही. पतंगराव कदम यांचे गुण माझ्यात आहेत, तसेच माझ्यातील स्वत:चे गुणही आहेत. विशाल पाटील यांना विनंती केली की भावा अपक्ष लढून नको. राज्यसभा भेटेल. पुढची लोकसभा लढवू, जिंकू. काँगेसचा हात टिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. तोंडावरचा घास हिसकावून घेतला, पुन्हा असे होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कुणाचे विमान कुठे गेले हे मला सांगायची गरज नाही. शेवटी सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी चंद्रहार पाटील यांना विधापरिषद दिली अशीही ऑफर दिली. सांगलीत मविआच्या उमेदवारला मतदान होईल पण पुन्हा मित्रपक्षांना समजावून सांगा, विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळीज घ्या. याचा वचपा नक्की विधानसभामध्ये काढू, असा इशारा विश्वजीत कदम यांनी दिला.