नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली नाशिकच्या केन्सिगटन स्पोर्ट्स क्लब चानसी, गंगापूर रोड, नाशिक येथे २६ टे २८ एप्रिल,२०२४ दरम्यान ४४ व्या सुहास वैद्य स्मूती चषक महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये टीम ऑफ फोर (सांघिक स्पर्धा) आणि पेअर्स (जोडी) या दोन प्रकारांचा समावेश आहे. ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमावली नुसार ही स्पर्धा खेळविळी जाणार आहे. या स्पर्धेला विक्रमी खेळाडूंचा प्रतिसाद सहभाग मिळाला असून यामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून १२६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने कुमार गटाच्या खेळाडूंनीही संधी मिळावी यासाठी कुमार (ज्यूनीयर) आणि युवक (युथ) गटाच्या खेळाडूंना पेअर्स प्रकारात सहभाग घेता येणार आहे. जेणेकरून या खेळाडू वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्ध्यासाठी मित्र विहार क्लब, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि केन्सिगटन क्लब, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे चेअरमन देवेन दोषी, सचिव हेमंत पांडे, जेष्ठ संघटक आनंद सामंत, डॉ. अविनाश देशपांडे, आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू तथा प्रशिक्षक अनिल पाध्ये, वसंत मोहिते, अनिरुद्ध सांझगिरी, शिरीष करकरे तसेच या स्पर्धेचे स्पर्धा चेअरमन विनोद कपूर, स्पर्धा सचिव डॉ. अतुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख (कॉम्पटिशन डायरेक्टर) म्हणून भालचंद्र दक्षिणदास तर बोर्डचे काम चेतन रावल आणि संगणकीय गुणलेखकाचे महत्वाचे काम विश्वनाथ बेडिया सांभाळणार आहेत.
शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यांनंतर सलग तीन दिवस स्पर्धा सकाळी ९.३० ते ०१.०० आणि ०२.०० ते ०६.०० या वेळेत खेळविली जाणार आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार दिनांक २८ रोजी सायंकाळी पार पडेल अशी माहिती आयोजकनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहन उकिडवे, सूर्या रेड्डी, तुषार मोगरे, राहुल खांबाटे, प्रदीप देशपांडे आणि सहकारी परिश्रम घेत आहेत.