नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर वाडीव-हे जवळ प्रवासी इकोगाडी पलटी झाली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहे. या अपघातात जखमी झालेल्या दोन जणांना वाडीव-हे मल्टीस्पेशालिस्ट हॅास्पिटलमध्ये तर ६ जणांना नाशिक येथे सिव्हिल हॅास्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारात मुंबई कडून नाशिक कडे जात असताना वाडीव-हेजवळ हा अपघात झाला.
या अपघातात कौशल्या गायकवाड (६०), सावित्री गुंजाळ (७०), अनिता गुंजाळ (५०), आनंद गुंजाळ (५३) हे सर्व रा मुलुंड मुंबई तर दिपक गुंजाळ (६०) रा. दौंड, पांडुरंग मारूती लेंडवे (५५) रा ठाणे, सोनाली उरूडे (३०) रा मध्ये प्रदेश हे जखमी झाले आहे. यातील एका महिलेचे नाव समजले नाही.
इको गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली. या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली व त्या जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील इको गाडीचा क्रमांक MH.04.JU.1533 हा आहे.