मंगळवार, नोव्हेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये कॉलेजरोडवरील तपस्वी बंगला हडपडण्यासाठी बिल्डरने दरोडा टाकण्याची दिली सुपारी…बिल्डरसह तीन जण गजाआड…नेमकं काय घडलं

एप्रिल 25, 2024 | 12:44 pm
in क्राईम डायरी
0
Screenshot 20240425 123303 WhatsApp


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कॉलेजरोड भागात कोट्यावधींचा बंगला बळकवण्यासाठी बांधकाम व्यावसायीकाने सुपारी देऊन वृध्द दांम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईत बिल्डरसह तीघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संशयितांना मुद्देमालासह गंगापूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.

याबाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. संदिप भारत रणबावळे,महादेव बाबुराव खंदारे,अरूण उर्फ बबन गायकवाड व बांधकाम व्यावसायीक अजित प्रकाश पवार अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री ही घटना घडली होती. शशिकुमार माधवराव तपस्वी (७५ रा.तपस्वी बंगला,एचपीटी कॉलेज समोर कॉलेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वयोवृध्द तपस्वी दांम्पत्याचे मुले परदेशात आहेत. तपस्वी दांम्पत्य रामनवमी निमित्त पंचवटी येथील काळाराम मंदिरात गेले होते. देवदर्शन करून ते रात्री १० वाजेच्या सुमारास घरी परतले असता ही घटना घडली.

काही वेळाने अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने शशिकुमार तपस्वी काय झाले बघण्यासाठी घराबाहेर पडत असतांना दबाधरून बसलेल्या चार लुटांरूनी त्यांना आतमध्ये ढकलून मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांना चाकुचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, कर्णफुले, अंगठी असे तीन लाख रुपयांचे दागिने, घरातील ५४ हजाराची रोकड व एक लाख २० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेचा झाला उलगडा
या प्रकाराची तपस्वी यांनी आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्याने वरिष्ठांसह गंगापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलीस यंत्रणा सीसीटिव्ही आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढत असतांनाच युनिटचे कर्मचारी नाझीमखान पठाण आणि आप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या घटनेचा उलगडा झाला.

अशी दिली गुन्हयाची कबुली
वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगे महाराज पुलाखाली एमएच १८ ई ६०८९ या स्प्लेंडर दुचाकीवरील संशयित संदिप रणबावळे आणि महादेव खंदारे यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. पोलीस तपासात बांधकाम व्यावसायीकाने वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बंगल्याची जागा मिळविण्यासाठी सुपारी दिल्याचे पुढे आले आहे. या घटनेत बिल्डर सह अन्य तीघाना बेड्या ठोकण्यात आल्या असून एक अल्पवयीन मुलासही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे करंजी गरड जि.वाशिंद येथील रहिवासी असलेल्या संशयित एकमेकांचे नातेवाईक असून ते शहरातील वेगवेगळया बांधकाम व्यावसायीकांकडे मजूरी काम करतात. त्यातील संदिप रणबावळे याचे बिल्डर अजीत पवार याच्याशी चांगले संबध आहेत.

८ ते १० टक्के कमिशन
बांधकामाच्या ठिकाणी दोघांच्या भेटी होत असल्याने अजीत पवार याने तपस्वी बंगल्याचा व्यवहार झाल्यास ८ ते १० टक्के कमिशन देईल अशी ग्वाही दिल्याने वृध्द दांम्पत्यास धमकाविण्यासाठी हा दरोडा टाकण्यात आला. बिल्डर पवार याच्या शहरातील पाईपलाईन रोडवर दोन तर लक्ष्मीनगर भागात एक बांधकाम साईट सुरू असून तपस्वी बंगल्याची जागा त्याच्या नजरेत भरल्याने हा कट रचण्यात आला. कॉलेजरोड सारख्या भागात जागा उपलब्ध झाल्यास व्यवसायात भरभराट होईल या हेतूने त्याने प्रथम वृध्द दांम्पत्याची कौटूंबिक माहिती संंग्रहीत करून काही महिन्यांपूर्वी दलालाच्या माध्यमातून तपस्वी दांम्पत्याची भेट घेतली होती. मात्र तपस्वी यांनी बंगला विक्री करण्यास सपसेल नकार दिल्याने त्याने मजूराच्या माध्यमातून रॉबरीचा कट आखल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये लक्ष द्यावे, आमच्याकडे खूप उमेदवार…प्रितम मुंडेच्या उमेदवारीवरुन भुजबळांचे खडे बोल

Next Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर इकोगाडी पलटी…आठ जण जखमी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20240425 WA0211 1 e1714030578546

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर इकोगाडी पलटी…आठ जण जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011