मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील म्हाळदे शिवारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पासून गिट्टी बनविण्याचे कारखाने असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा असून या कच-याला बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
या भयानक आगीची झळ बाजूच्या यंत्रमाग व सायजिंग कारखान्याला बसलीने त्यातील दोन तरासण जळून खाक झाले आहे. मालेगाव अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. त्यानंतर सात अग्सुनीशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवली.
सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी परिसरातील जवळपास शंभर पेक्षा जास्त नागरिकांना वेळीच येथून इतरांच्या मदतीने सुखरुप बाहेर हलविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे परिसरातील दीडशे यंत्रमाग कारखाने वाचल्याचेही बोलले जात आहे.