मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले!

एप्रिल 24, 2024 | 11:23 pm
in संमिश्र वार्ता
0
nanded 1 1140x570 1 e1713981166478


नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. पोलीस परेड ग्राउंडवर मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नव मतदारांनी रिले स्पर्धेत भाग घेतला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा स्वीप कक्षाने मतदान तरुण युवा मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व वाढावे, मतदानाविषयी त्यांना अधिक माहिती व्हावी, त्यांनी मतदान करण्याचे कर्तव्य निर्भीडपणे पार पडावा, यासाठी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात रिले स्पर्धा व गोळा फेक स्पर्धा तरुण नव मतदार युवकांची स्पर्धा घेण्यात आली. त्यांच्या हातात मतदान जनजागृतीचे बॅटन घेऊन हे सर्व तरुण मतदार 3000 एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांना मतदारांना आम्ही जिंकण्यासाठी धावतोय… मतदान जनजागृतीसाठी धावतोय… तुम्ही पण या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केंद्राकडे धाव घ्यावी अशा प्रकारचा संदेश या सर्व धावपटूंनी यावेळी दिला.

आकर्षक अशा रंगातील त्यावर मतदानाचे समर्पक असे स्लोगन लिहून बॅटनला सजवण्यात आले होते. या सर्व धावपटूंचं उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले या स्पर्धेला निवडणूक निरीक्षक डॉ.जांगिड यांनी सुरुवात केली. आकर्षक अशा मतदार जागृतीचे संदेश लिहिलेल्या बॅटनचे कौतुक केले. तर दुसऱ्या रिले स्पर्धेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुरुवात करून दिली. तर महिला रिले स्पर्धेची सुरुवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप जिल्हा नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी करून दिली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे उपस्थित होते. या स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक हदगाव तालुक्यातील संघाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक बिलोली या तालुक्यातील संघाने पटकावला. तर तृतीय क्रमांक कंधार या तालुक्यातील संघाने पटकावला.

महिला रिलेमध्ये कंधार या तालुक्यातील संघाने प्रथम क्रमांक तर किनवट या तालुक्यातील संघांनी द्वितीय क्रमांक तर देगलूर या तालुक्यातील संघाने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी गोळाफेक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचें सुद्धा आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे गोळ्यावर ते VOTE असा संदेश पेंट केला होता. त्यामुळे दोन्हीही स्पर्धा या आगळ्यावेगळ्या जागृतीने ओळखल्या गेल्या. या स्पर्धेचे पंच म्हणून प्रलोभ कुलकर्णी, सुशील कुरडे, खोकले बाबुराव कुलूपवाड, मोहम्मद खालिक, वैभव दमकुंडवार, गोविंद पांचाळ, ज्ञानेश्वर सोनसळे, शक्ती घोडगे, शिवकांता देशमुख, यांच्यासह अनेक पंचांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्विप टीमचे रवी ढगे, डॉ राजेश पावडे, सारिका आचमे, अशा घुगे, सुनील मुत्तेपवार, बालासाहेब कचवे सुनील आलूरकर, दीपक भांगे, संतोष किसवे पाटील यांनी परिश्रम घेतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) वाहन तपासणी…तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम

Next Post

तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले इतके किलो सोने व चांदी जप्त

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
1YZFL e1713981762943

तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले इतके किलो सोने व चांदी जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011