इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीवरुन तिकीट वाटपावरुन तिढा असतांना आता नवीन ट्विस्ट आला आहे. या मतदार संघात आता बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीच बीडच्या सभेत ही घोषणाच केल्यामुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे.
या जागेवर अगोदरच भाजपने दावा केला आहे. त्यामुळे हे नाव नव्याने आल्यामुळे शिंदे गटासह, राष्ट्रवादीलाही धक्का बसणार आहे. बीड येथे झालेल्या सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या, बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेचं काय असा प्रश्न अनेकांना प्रश्न पडला आहे. पण, प्रीतम मुंडे यांची काळजी करुन नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन. प्रितम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही. तिचं कुठेही अडणार नाही असेही त्यांनी सांगितले.
प्रितम मुंडे यांचे सासर हे नाशिकला असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत हे विधान केले.