जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणूकची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर सहाव्या दिवशी २४ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ११ उमेदवारांनी ३० अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ८ उमेदवारांनी २६ अर्ज घेतले. तर सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ५ उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले.
त्यात करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी ३ अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी ३ अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी २ अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण ५ उमेदवारांनी ९ अर्ज दाखल केले.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने ४ अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष )असे ८ उमेदवारांनी ११ अर्ज असे एकूण जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात २० उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले.