इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१९७७ साली आणीबाणी नंतर जे वातावरण होते जो राग होता पण दिसत नव्हता. हळू हळू जनतेनी निवडणूक हातात घेतली आणि इंदिराजी पराभूत झाल्या. तीच परिस्थिती आज दिसते लोकांनी आपल्या हातात निवडणुका घेतल्या आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होणार असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
आव्हाड यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काल व आज मी रायगड, जळगाव, रावेर ह्या लोकसभा मतदार संघात प्रचार निम्मित गेलो होतो एक बदल जो मला दिसतो आहे तो म्हणजे लोक उत्साहात आहेत. १९७७ साली आणीबाणी नंतर असेच वातावरण होते राग होता पण दिसत नव्हता. हळू हळू जनतेनी निवडणूक हातात घेतली आणि इंदिराजी पराभूत झाल्या तीच परिस्थिती आज दिसते लोकांनी आपल्या हातात निवडणुका घेतल्या आहेत इतिहासाची पुनरावृत्ती……होणार असे म्हटले आहे.
आव्हाड सारखे अनेक सभांतून महाविकास आघाडीचे नेतेही हाच विश्वास व्यक्त करता. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार हे निकालानंतरच समोर येणार आहे.