इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यानंतर त्या छत्रपती संभाजीनगरच्या येथे आणण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या आधी उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना याआधी गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच रुग्णालयात आजही दाखल करण्यात आले. त्यांना उन्हाचा त्रास झाल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे महाराष्ट्रात ठिकठिकाणी जावून मराठा समाजाच्या नागरिकांना आपली भूमिका मांडत आहे. ते बीडच्या दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.