अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सार्वत्रिक लोकसभा निवडणू अंतर्गत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज ७ उमेदवारांनी ११ नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर शिर्डी लोकसभा मतदार संघात ९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज ७ व्यक्तींनी १४ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.
अहमदनगरमध्ये मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी) यांनी एक नामनिर्देशनपत्र, कोठारी रवींद्र लिलाचंद (अपक्ष) दोन नामनिर्देशनपत्र, अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) तीन नामनिर्देशनपत्र, महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी) एक नामनिर्देशनपत्र व अपक्ष एक नामनिर्देशनपत्र, गावडे मच्छिंद्र राधाकिसन (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र तर पानसरे छगन भिकाजी (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. आज ११ जणांना १८ नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हा निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), ॲड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी) व उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)या ९ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.