इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळच्या पुसद येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आल्यामुळे तारांबळ उडाली. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभेच भाषण करतांनी ही भोवळ आली. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले.
भोवळ आल्यानंतर नितीन गडकरी यांच्या अंगरक्षकांनी त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करुन त्यांना खुर्चीवर बसवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर सभास्थळी ग्रीन रुममध्ये त्यांना बसवण्यात आले. त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.
विदर्भमामध्ये सध्या उन्हाचा पार जास्त आहे. त्यात ही प्रचार सभा भर दुपारी सभा होती. त्यामुळे भोवळ आल्याचे बोलले जात आहे. याअगोदही असा त्रास गडकरींना झाला आहे. त्यानंतर दुस-यांदा ही घटना घडली.