मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेडी-टू-कुक एशियन खाद्यपदार्थांमध्ये विशेष नैपुण्य असलेल्या मास्टरचाउ या भारतात नावारूपाला आलेल्या ब्रॅंडने आपला ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रारशी भागीदारी केल्याचे सहर्ष जाहीर केले आहे. ‘असली चायनीज’ पदार्थांसाठी मास्टरचाउला ग्राहकांचे सर्वात लाडके स्थान बनवणे आणि लोकांचा विश्वास जिंकून त्यांना आपलेसे करण्याचा या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश आहे.
रणवीर ब्रारशी भागीदारी करण्याचा निर्णय मास्टरचाउने घेण्यामागचे कारण म्हणजे हे दोन्ही ब्रॅंड अस्सलता आणि गुणवत्तेच्या बाबतीत समर्पित आहेत. मास्टरचाउची टॅगलाइन आहे ‘असली चायनीज’ आणि शेफ रणवीर ब्रार त्याच्या अस्सल फ्लेवर्सविषयीच्या पॅशनबद्दल आणि पाककलेतील नैपुण्याबद्दल ओळखला जातो. रणवीर ब्रारच्या पाककलेच्या तत्वज्ञानाशी सहमत असलेल्या मास्टरचाउचा हेतू बाजारपेठेत अस्सल चायनीज पाककृतींचा विश्वसनीय प्रदाता म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचा आहे. लोकप्रिय शेफ रणवीर ब्रारमध्ये देखील मास्टरचाउची ती भावना दिसते, जी आपल्या प्रामाणिक व रुचकर चायनीज शैलीच्या पदार्थांसह आपल्या वाढत चाललेल्या आणि निष्ठावान ग्राहकांसाठी स्वादाची पातळी आणखी उंच घेऊन जाण्यासाठी वचनबद्ध आहे.
मास्टरचाउचे संस्थापक विदुर कटारिया म्हणाले, “रणवीर ब्रार म्हणजे अस्सलता, इनोव्हेशन आणि पाककलेत उत्कृष्टतेचा निरंतर ध्यास यांचे प्रतीक आहे. उत्तम पदार्थ बनवण्यातील त्याचे नैपुण्य आणि त्याचे पॅशन मास्टरचाउ ब्रॅंडची वृत्ती दर्शवितो आणि आम्ही दोघे एकत्र मिळून आता या उद्योगात धमाल उडवून देण्यास सज्ज आहोत. आम्ही केवळ एक असा अनुभव देऊ करत आहोत जो ग्राहकाला प्रत्येक घासातून अजोड चव आणि गुणवत्ता देण्याची हमी देत आहे. रणवीरला आमच्या सोबत घेऊन आम्ही घरच्या घरीच बसून लोक चायनीज फूडचा आस्वाद कसा घेतात याच्या पद्धतीत क्रांती करण्यास तयार आहोत.”
शेफ रणवीर ब्रार म्हणाला, “एक शेफ म्हणून अविस्मरणीय खाद्यानुभव देण्यासाठी अस्सल फ्लेवर्स आणि घटक पदार्थ वापरण्याचे महत्त्व मी जाणतो. मास्टरचाउशी हातमिळवणी करून त्यांच्या अद्भुत उत्पादन शृंखलेद्वारे अस्सल एशियन क्युझीनचा पुरस्कार करताना मला खूप आनंद होत आहे. मास्टरचाउसह भारतातील घराघरात ‘असली चायनीज’ फ्लेवर्स घेऊन जाण्यास मी उत्सुक आहे.”