हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज हिंगोली लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हदगाव येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली.
‘आता लढायचं आणि गद्दारांना गाडायचंच‘ हा निर्धार हिंगोलीकरांनी केलाय, ह्याची प्रचिती सभेसाठी उसळलेला जनसमुदाय देत होता. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी संवाद साधताना उपस्थितांना वचन दिले. की महाराष्ट्राचं लूटलेलं वैभव परत आणून, मी महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे नेणार.
सभेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तेजस ठाकरे, उपनेते लक्ष्मणराव वडले, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, विधान परिषदेच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात उपस्थित होते.