नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी पावसाळ्यात पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या छतातून पाणी गळू नये या संकल्पनेतून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे नुकत्याच झालेल्या रिजनल प्रॉपर्टी महोत्सवा साठी वापरलेले फ्लेक्स जनजाती कल्याण आश्रम या संस्थेस देण्यात आले असून यामुळे या फ्लेक्स चा वापर तर होईलच पण पर्यावरण संवर्धनासाठी पण मदत होईल असे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले.
अशा उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून जनजाती कल्याण आश्रम या भारतभर काम करणाऱ्या संस्थे मार्फत पूर्ण देशात या फ्लेक्स चा उपयोग केला जाईल. यावर्षी जवळपास २५००० ते ३०००० स्क्वेअर फुट फ्लेक्स संस्थेला देण्यात आला असल्याचे पण ते म्हणाले. क्रेडाई नाशिक मेट्रो नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून असे वेगवेगळे उपक्रम राबवित असते.
याप्रसंगी मानद सचिव गौरव ठक्कर, सह सचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, ऋषिकेश कोते, मॅनेजिंग कमिटी मेंबर सागर शहा, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे तसेच जनजाती कल्याण आश्रम चे सुनील सावंत, महेश संत, दिपा ब्रम्हेच्या, विमल मडके, जयेश पाडवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.