इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैद्राबादमधील भाजप उमेदवार के. माधवी लता या प्रचार करत असतांना त्यांची महिला सहायक उपनिरिक्षकची झालेली हस्तांदोलन व गळाभेट व्हायरल व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली. या व्हिडिओमुळे ही महिला पोलिस अधिकारी उमा देवी मात्र निलंबित झाली. शहर आयुक्त के. श्रीनिवास रेड्डी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.
हैद्राबादची निवडणूक सध्या देशभर चर्चेत आहे. भाजपतर्फे के. माधवी लता या एएमआयचे असुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे.