इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली मेट्रो नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. या मेट्रोमध्ये होणारी गर्दी हा सुध्दा प्रवाशांना त्रासदायक ठरतो. त्यामुळे जागेवरुन वाद होणे, जागा न मिळणे हे तर होतच असते. त्यातही रिल काढणा-यांचे अनेक किस्सेही या मेट्रोमध्ये घडतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला असून त्यात जागेवरुन वाद सुरु असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये महिला जे बोलते त्यावर चांगलाच नेटक-यांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रोमध्ये जागा मिळत नसल्याने चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर जाऊन बसते. मांडीवर जाऊन बसल्यानंतर म्हणते, मला काय, आम्हीपण बेशरम होऊ यादरम्यान बाजूच्या जागेवर बसलेला व्यक्ती जागेवरुन उठतो. महिला म्हणते की, ‘मला फरक पडत नाही. तुम्हाला फरक पडत असेल. तेही आता नाही रात्री फरक पडत असेल. नंतर ही महिला म्हणते ती नेहमी नियमांचे पालन करते. मी नियम का मोडू?
खरं तर जागेसाठी तिने सांगितलेला तर्क यावर नेटकरी चांगलेच भडकले आहे. रात्री तुम्हाला फरक पडेल यावरही अनेकांनी जोरदार टीका केलेली आहे. खरं तर महिलांना पुरुषांनी जागा करुन द्यायला हवी हे जरी खरं असले तरी एखाद्याने नाही दिली तर त्यावर अशा पध्दतीने संभाषण करणे यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर बघा हा व्हायरल व्हिडिओ,,,