मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित (एमएससीएमएफएल) सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे दिनांक 19.10.2023 च्या पत्राद्वारे गव्हाचे अतिरिक्त वाटप केले आहे. गहू/आट्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने वाटप केले असून वाटप केलेला गहू आट्यात रूपांतरित केला जाऊ शकतो आणि “भारत आटा” ब्रँड अंतर्गत सामान्य ग्राहकांना विकला जाऊ शकतो.
त्यानुसार, भारतीय अन्न महामंडळ ‘भारत’ ब्रँड अंतर्गत वितरणासाठी वर नमूद केलेल्या संस्थांनी केलेल्या मागणीनुसार योग्य पद्धतीनुसार स्टॉकची उपलब्धता सुनिश्चित करत आहे, या संस्थांनी केलेल्या मागणीप्रमाणे आणि मंत्रालयाने जारी केलेल्या वाटपाअंतर्गत गव्हाचे काटेकोरपणे वितरण केले आहे.
ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने त्यांच्या दिनांक 18.01.2024 च्या पत्राद्वारे, केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित (एमएससीएमएफएल) सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे [(OMSS (D)] अंतर्गत “भारत तांदूळ/ भारत चावल” ब्रँड अंतर्गत सामान्य ग्राहकांना विक्री करण्यासाठी नॉन फोर्टिफाइड तांदळाचे अतिरिक्त वाटप केले होते. 22.04.2024 पर्यंत, या संस्थांना 2,04,220 मेट्रिक टन गहू आणि 1,93,531 मेट्रिक टन वाटप करण्यात आले असून 1,31,846 मेट्रिक टन गहू आणि 61,643 मेट्रिक टन तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडून उचलण्यात आले आहेत.
सुरुवातीला या योजना 31.03.2024 पर्यंत वैध होत्या परंतु नंतर त्यांची मुदत 30.06.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ संबंधित संस्थांना 1715 रुपये प्रतिक्विंटल दराने गहू आणि 18.59 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देत आहे. त्यानंतर या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना 5Kg/10 Kg च्या पॅकेजमध्ये 27.50 रुपये प्रति किलो या दराने (आटा) आणि 29 रुपये प्रति किलो या दराने (तांदूळ) अशी अन्नधान्याची विक्री करतील.