इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : बरोबर एक वर्षापूर्वी नागपुरातील विशेष एटीएस न्यायालयाने बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी चौघांना बारा वर्षांची शिक्षा सुनावली होती. नकली नोटा चलनात आणणे हे दहशतवादी कृत्यासारखे आहे, असे न्यायालयाने नमूद केले होते. २०१५ मधील ऑक्टोबर महिन्यामध्ये शालिमार एक्स्प्रेसमध्ये बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. एटीएसने गोपनीय माहितीच्या आधारे साडेनऊ लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्यावेळी एकाला ताब्यातही घेण्यात आले होते.
त्यानंतर पुन्हा तिघांना एटीएसने ताब्यात घेत त्यांच्याकडूनही लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या, पुन्हा एक वर्षाने नागपुरात एटीएसच्या छाप्यात २७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र ते चलन नकली नसून अस्सल भारतीय चलन आहे. त्यामुळे नकली नोटा शोधण्यासाठी गेलेल्या एटीएसची गोपनीय माहिती चुकची निघाली ? की एटीएसच्या छाप्यापूर्वीच नकली नोटा तिथून गायब करण्यात आल्या ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
नकली नोटा गायब असली आल्या
वास्तविक पाहता नक्की नोटा बाळगणे गुन्हा आहे, मात्र आणि भामटे नकली नोटा व भारत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यात चांगल्या माणसांची फसवणूक होते, अशाच प्रकारे नकली नोटांचा साठा असल्याची कुणकुण तथा गुप्त माहिती एटीएसच्या पथकाला नागपुरात लागली होती, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी छापा टाकला असता, त्या नकली नोटा नसून खऱ्या नोटा असल्याचे समजते, त्यामुळे या नोटा गेल्या कुठे ? आणि इतक्या नोटा त्याच्याकडे आल्या कशा ? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या ( एटीएस) नागपूर युनिटकडून नागपूरच्या हसनबाग भागात केलेल्या या मोठ्या कारवाईची चर्चा मात्र चांगलीच रंगली आली. या छाप्यात रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमीष दाखविणाऱ्या भामट हा व्यवसायाने ऑटो डिलर असून त्याच्या घरातून रोख २७ लाख ५० हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. एवढी मोठी रक्कम त्याने कुठून आणि कुणासाठी आणली होती याचा शोध एटीएसकडून घेण्यात येत आहे.