इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातून मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाला हायसे वाटत असतांना काल प्रफुल्ल पटेल यांनी नाशिकची जागेवरील दावा सोडला नसल्याचे सांगितले. तर आज छगन भुजबळ यांनी मी उमेदवार नसलो तरी आमच्याकडे आ.माणिकराव कोकाटे, प्रेरणा बलकवडे, माजी. खासदार देविदास पिंगळे हे उमेदवार असल्याचे सांगत नवा ट्विस्ट आणला आहे.
त्यांच्या या दाव्यानंतर मात्र महायुतीची चिंता वाढली आहे. शिवसेना शिंदे गटाने अद्याप पर्यंत उमेदवार जाहीर न केल्यामुळे एकीकडे धाकधुक वाढलेली असतांना दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा दावा करुन स्पर्धा तयार केली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमदेवार जाहीर केला. त्यानंतर वंचितनेही उमेदवारी दिली आहे. पण, महायुतीचा उमेदवार ठरला नाही. या तिढ्यामागे नेमकं कारणही पुढे येत नसल्यामुळे रोज वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे.