नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयएसपी मध्ये जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जीवनावरील विविध पुस्तकांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्राचार्य दीपक आहिरे आणि मनमाड सार्वजनिक वाचनालायचे माजी अध्यक्ष गौतम संचेती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य राम फुल मीना, मनेश हावरगे, राजेश कुमार पाटील ,अजय देशपांडे, संजय गांगुर्डे, सुनिता चौबे, योगिता ठाकूर, सनेहा सिंह, अंजली त्रिपाठी, अमित पाटील, सुरेखा माळी, राम प्रकाश पांडे, विक्रम गांधले, पमा अहिरे, सुजाता कर्डिले, विनोद धायडे, लीलाचंद किर्वे, नारायण मिस्त्री, दिव्या शर्मा विद्यालयातील या त्यांच्या वर्ग शिक्षकांसोबत विद्यार्थ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन मध्ये त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून घेतला.तसेच अनिल महाजन यांनी जागतिक पुस्तक दिनानिमत्ताने सकाळच्या प्रार्थना सभा मध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून देत ज्ञान मिळवण्याचे एकमेव स्त्रोत कसे आहे हे पटवून देत वाचाल तर वाचाल हा मंत्र दिला.