नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज खासदार हेमंत गोडसे यांनी अंजनेरी येथील हनुमान मंदिरात जावून पवनपुत्र हनुमानांचे दर्शन घेतले. दरम्यान खा. गोडसे यांनी हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या परमपुज्य शांतीगिरी महाराज यांना वंदन करत त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी प. पू. शांतीगिरी महाराज यांनी खा. गोडसे यांना शाल, श्रीफळ दिले. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या खा. गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांच्यातील स्नेहसंबंध पाहुन उपस्थितांना हायसे वाटले.
खा. गोडसे हे हनुमानांचे निस्सिम भक्त आहेत. आज सकाळी खा. गोडसे यांनी अंजनेरी गडावर जात मनोभावे हनुमानांचे दर्शन घेतले. यावेळी खा. गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी हनुमानांचा एकच जयघोष करत मंदिर परिसर दणाणून सोडला. हनुमानांचे दर्शन घेतल्यानंतर खा. गोडसे यांनी मंदिरात धार्मिक विधी करत असलेल्या प. पू. शांतीगिरी महाराजांचे आशिर्वाद घेतले. यावेळी शांतिगीरी महाराजांनी खा. गोडसे यांना शाल, श्रीफळ देत संवाद साधला. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या खा. गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांच्यातील स्नेहसंबंध पाहुन उपस्थितांना हायसे वाटले. यावेळी शांतीगिरी महाराजांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.