नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून परिचीताने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बळजबरीने गर्भपात केल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय मदन पगारे (रा.सुर्यवंशी लॉन्स जवळ, सोयगाव ता.मालेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्या २०२२ पासून प्रेमसंबध आहे. गेल्या दीड दोन वर्षात संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर सोयगाव व शहरातील दिंडोरीरोड भागात घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला.
यातून तरूणी गर्भवती राहिल्याने संशयिताने तिला बळजबरीने गर्भनिरोधक गोळया देवून तिचा गर्भपात केला. यामुळे पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.