नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा)- सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर बसला लागली आग लागल्याची घटना घडली. सटाणा-प्रतापूर या मार्गावर धावणारी ही बस होती. खिरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवाशी होते. बसला आग लागल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले
पेटलेल्या बसची आग विझवण्याचा चालकाने प्रयत्न केला. त्यानंतर सटाणा येथून अग्निशामक दलाल आग विझविण्यासाठी तातडीने दाखल झाले. पण, तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.